BJP Vinchur
BJP Vinchur  
मुख्य बातम्या मोबाईल

भारती पवारांच्या जन आशीर्वाद यात्रेत भाजप कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले!

सरकारनामा ब्युरो

येवला : राज्यभर भाजप- शिवसेनेमध्ये तणाव असताना येथे जनाशीर्वाद यात्रेवेळी भाजपच्या गटातच राडा झाला. (Tension in BJP janashirwad yatra in state) येथील विंचूर चौफुलीवर (In Vinchur square BJP workers faught with each other) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचे आगमन झाल्यावर त्यांचा मिरवणूक रथ कोणत्या मार्गावरून न्यायचा, यावरून गटबाजीचे जोरदार प्रदर्शन दिसले. भाजप कार्यकर्ते रथाला धरून इकडे- तिकडे ओढत होते. यावेळी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर जनाशीर्वाद यात्रा नियोजित स्थळी गेली.

डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली जनशीर्वाद यात्रा आज विंचूर चौफुलीवर आली. या ठिकाणी स्थानिक भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने स्वागतासाठी हजर होते. विंचूर चौफुलीवरून मिरवणूक कोणत्या मार्गाने न्यावी, यावरून नगरसेवक प्रमोद सस्कर आणि जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांच्या गटात वाद झाला. दोन्ही गटांत चौफुलीवरच गटबाजीचे प्रदर्शन झाले. थेट मंत्र्यांसमोर राडेबाजी होत असल्याने पोलिसांनी परवानगी घेत मिळालेल्या मार्गावरूनच रथ नेला. डॉ. पवार आणि इतर नेते हे आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गटबाजीचे प्रदर्शन पाहत होते.

जन आशीर्वाद यात्रा शनी पटांगणावर आल्यानंतरही पुन्हा स्वागतावेळी दोन गटातील संघर्ष दिसून आला. डॉ. पवार यांचे या ठिकाणी प्रमोद सस्कर यांनी सत्कार करत स्वागत केले. डॉ. पवार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना मला पुढे कार्यक्रम आहे, तुम्ही असा आग्रह करू नका, असे वारंवार सांगत होत्या.

यासंदर्भात जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे म्हणाले, आम्ही पोलिस ठाण्यात अर्ज करून यात्रेसंदर्भात परवानगी घेतली होती. त्यात इंद्रनील मार्गाने जाण्याची परवानगी घेतली होती. त्या मार्गानेच मिरवणूक न्यावी, असा आमचा आग्रह होता. नगरसेवक सस्कर यांचा मात्र त्याला विरोध होता. त्यांना मार्गाबाबत काही माहिती नव्हती. त्यामुळे रस्ता खराब असल्याचे सांगत त्यांनी मार्ग बदलला. काही कार्यकर्त्यांना ते पसंत पडले नाही. दोन्ही बाजुंचे कार्यकर्ते त्यावरून वाद गालू लागले. त्यामुळे हा वाद घडला. हा अंतर्गत वाद असल्याने त्याची फार चर्चा करू नये.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT